किडणीच्या आजारावर प्रतिबंध करणे आणि अशा दोन्ही प्रकारचे उपाय होमिओपॅथीद्वारे करता येतात. त्यामध्ये नुसते कारण बघुन नव्हे तर त्याचे कारण ओळखुन त्यावर उपाय केले जातात. आणि किडणीच्या अनेक व्याधीमध्ये त्याचे उत्तम परिणाम आढळुन आलेले आहेत. तसेच ही औषधी कोणत्याही वयाच्या लोकांना देता येतात. कित्येक गंभीर किडणीच्या आजाराचे निदान करून त्यावर योग्य होमिओपॅथीक उपचार यशस्वी झालेले आहेत.
कोणत्या आजारावर उपचार ?
१) किडणीच्या फेल्युअर अर्थात किडणी निकामी होणे -
या गंभीर आजारामध्ये होमिओपॅथीचे आश्चर्यजनक परिणाम दिसुन आलेले आहेत. जसे रूग्णाच्या प्रकृतीत पहिल्या दिवसापासुन सुधारण होवुन आजाराशी निगडीत सर्व लक्षणे कमी होऊ लागतात. जर हा आजार पहिल्या किंवा दुस-या टप्यात असेल तर रूग्ण निश्चितच अल्पकाळात संपुर्ण बरा होतो.
२) किडणी स्टोन -
किडणी स्टोन अर्थात मुतखडा या आजारावर होमिओपॅथीमध्ये अगदी अचुक व परिणामकारक औषधी उपलब्ध आहेत. किडणी स्टोनसाठी रूग्ण मिळेल तो उपचार घेतात व त्यांना परिणाम कारक रिजल्ट न भेटल्यास शेवटी होमिओपॅथीकडे रूग्ण वळतात. या उलट जर रूग्ण सुरूवातीलाच होमिओपॅथीक औषधी घेतली तर रूग्ण लवकर बरा होतो.
३) लहान मुलांचे किडणीचे आजार -
लहान मुलांमध्ये दिसुन येणारा नेफ्रोटीक सिंड्रोम हा आजार ब-याच मुलांमध्ये दिसुन येतो. याची लक्षणे म्हणजेच चेहे-यावर सुज येणे याला पाणथळ म्हणतेत. लघवीतुन साधारणपणे दिवसाला ३ ग्रॅमपेक्षा जास्त प्रथीने जाणे, कोलस्टेरॉलची पातळी वाढणे आणि अल्बुमीनची पातळी कमी होणे, अशी लक्षणे दिसुन येतात. यावर सुध्दा वेळीच होमिओपॅथीक औषधी घेतल्याने कमकुवत किडणी मजबुत होण्यास मदत होते.
४) गर्भावस्थेतील महिलांचे किडणीचे आजार -
यावर गर्भावस्थेमध्ये गर्भाचा भाग नसावर पडल्याने किडणीवर दबाव निर्माण होवुन पायावरती सुज येते. तसेच मुत्राशयमुख किंवा मुत्राशयात रक्तप्रवाह तुंबुन अडथळा निर्माण होतो. रबरी नळी मुत्राशयात घालणे, गर्भारपण मधुमेह यात संसर्ग होतो. त्यामुळे लघवीचे आजार निर्माण होतात इत्यादी.
५) मधुमेह व उच्चरक्तदाब संदर्भातील किडणीचे आजार -
यामध्ये रक्तातील साखरेची वाढ आणि अनियंत्रीत रक्तदाबामुळे किडणीवर अनेक गंभीरस्वरूपाचे परिणाम होतात. बरीच वर्षे या रोगाचे कोणतेही लक्षण दिसत नाही. पाठदुखी, रक्तलघवी, पोट भरल्यासारखे वाटणे, धाप लागणे ही सुरूवातीचे लक्षणे दिसुन येतात. हा रोग परतवुन लावण्यासाठी वेळीच उपचार व काळजी घेणे गरजेचे असते.
६) वृध्दावस्थेतील किडणीचे आजार -
ब-याच वेळेस वय जास्त झाल्यामुळे शरीर थकल्यामुळे रूग्ण कमकुवत झालेला असतो. त्यात अशा आवस्थेत किडणीचे आजार किंवा मुतखडा / प्रोस्टेट, लघवीतील जंतुससंर्ग आजार उदभवतात. अशा वेळेस रूग्ण गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल होता. परिणामत: या आजारावर दिली जाणारे औषधी रूग्णाला सोसत तर नाहीच व वय झाल्यामुळे ऑपरेशन करणे शक्य नसते. मग अशा आवस्थेत वृध्द व्यक्तीसाठी सहज परिणाम करणारी होमिओपॅथीचे औषधी खुप सहाय्यक ठरते.
किडनीच्या अजारावर होमिओपॅथीक उपचारच का ?
१) कारण किडणीच्या ब-याच आजारावर होमिओपॅथीच्या औषधींचा खुप चांगला परिणाम दिसुन आलेला आहे. अनेक व्याधी ज्या आधुनिक वैद्यकशास्त्राला अव्हानात्मक वाटतात. नेमक्या अशा व्याधीमध्येच होमिओपॅथी चांगला परिणाम देते. उदा. किडणीचे आजार असो. अथवा कर्करोग (वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होऊन पसरणारा) मधुनेह इत्यादी. होमिओपॅथीच्या औषधीची मात्रा फार कमी प्रमाणात वापरावी लागत असल्याने त्याचे इतर दुष्परिणाम खुपच कमी दिसतात हे महत्वाचे.
२) किडणीचा गंभीर अथवा अतिगंभर आजारावरसुध्दा अगदी औषधी दिल्यापासुन म्हणजे लगेचच परिणाम दिसुन आलेले आहेत. पहिल्या तिनच दिवसामध्ये रक्तातील वाढलेले दोष व किडणीच्या कार्यात सुधारणा दिसुन आलेली आहे.
३) रूग्णांमध्ये आजारामुळे निर्माण झालेली लक्षणे व त्रास खुप कमी वेळेत नियंत्रणात येऊ लागतो.
४) या उपचारामध्ये रूग्णाचा इतिहास विस्तारपणे विचारला जातो. तसेच रूग्णाची शारिरीक व मानसिक लक्षणे बघुन त्याप्रमाणे रूग्णाची औषध योजना निश्चित केली जाते. औषध योजना लांबलेल्या आजारामध्ये, छोट्या आजारामध्ये, त्वरीत प्रकारच्या आजारामध्ये व आजाराप्रमाणे विशिष्ट औषध योजना करतात. अशा प्रकारे किडणी रोगावर प्रतिबंध करणे आणि त्याचे निवारण अशा दोन्ही प्रकारचे उपाय होमिओपॅथीद्वारे केले जातात.
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ प्रधान होमिओपॅथी अकोला
9881447181
ONLINE CONSULTATION AVAILABLE
To book your appointment call / whats app on above contact no.