आज आपण *लहान मुलांमधील तसेच मोठ्यांमधीलअंथरून ओले करणे त्याची कारणे आणि त्यावरील होमिओपॅथिक उपचार* यावर माहिती बघूया..
आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अहो बघा ना येवढा मोठा झाला तरी रात्रीच्या वेळेत बिछान्यात अजूनही सू-सू करतो, अशी चर्चा अनेकदा कानावर पडते. सुरवातीला लहानग्यांना समजावून सांगितले जाते, मग त्यांना भीती दाखवली जाते. पण ही सवय काही सुटत नाही. वास्तविक ही सवय नाही तर यामागे काही कारणे आहेत. मोठ्यांमध्ये अंथरुण ओले होण्याची कारणे वेगळी आहेत त्याबद्दल माहिती आपण या लेखातून घेऊ या.
लहान मुलांमध्ये रात्रीच्या वेळेत बिछाना ओला करण्याची सवय पाच वर्षानंतरही सुरुच राहिली तर दुर्लक्ष करून चालत नाही. वैद्यकीय भाषेत सांगायचे तर याचे ‘प्रायमरी’ व ‘सेंकडरी नॉक्टर्नल’ असे दोन प्रकार असतात. प्रायमरी नॉकचर्नल इनयुरेसिस म्हणजे लहानग्यांना खूप लहानपणापासून बिछाना ओला करण्याची सवय असणे आणि ती सवय पाच वर्षानंतरही सुरू राहाते. सेकंडरी नॉक्टर्नल इन्शुरेसीस म्हणजे किमान सहा महन्यिांच्या कालावधीकरीता बिछाना ओला करण्याची सवय सुटल्यानंतर पुन्हा एकदा बिछाना ओला करणे सुरू करणे.
कारणे :
काही मुलांना मूत्राशयाचा कोणताही त्रास होत नाही. पण मूत्र साठवण्याची क्षमता कमी असते. त्यासाठी लघवी करण्याची निकड भासते.
मूत्राशयाचा, मूत्राशयातून बाहेर जाणा-या किंवा मूत्राशयाकडे येणा-या चेतापेशींचा विकास होण्यात विलंब होणे,
झोपेत असताना लघवीसाठी गाढ झोपेतून जागे न होता न आल्याने नकळत बिछाना ओला करणे,
मूत्राशय अस्वाभाविकपणे आकुंचन पावणे,
मूत्राशयात स्नायूंमधील आकुंचनामुळे मूत्राशय पूर्ण भरण्याआधीच रिकामे होणे किंवा रात्रीच्या वेळेस शरीरात अँटी डाययुरेटिक हार्मोन्स कमी जास्त प्रमाणात स्रवणे आणि लघवी होणे असे प्रकार होतात.
काहींमध्ये ही सवय अनुवंशिक असल्याचेही दिसून येते.
ताणतणाव तसेच अनामिक भीती यामुळेही मूल नकळत अंथरून ओले करतात
मोठ्यांमध्ये डायबेटीस, ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर, प्रोस्टेट संबंधी आजार, संबंधित कॅन्सर, पार्किन्सन्स आजार, मानसिक आजार, काहि औषधी इ मुळे नकळत अंथरूण ओले होते.
होमिओपॅथी उपचार :
प्रत्येक बालकासाठी व मोठ्यासाठी कारणपरत्वे उपचार वेगळे असू शकतात. त्यासाठी औषधांपेक्षा या समस्येच्या मूळापर्यंत जाण्याची गरज आहे. काहींना दीर्घ तपासण्या करण्याची गरज असते तर काहींना मोजक्याच तपासण्या केल्या तरी चालते. त्यानंतर ही सवय कायमची बंद होऊ शकते.
एकूणच अंथरून ओले करण्याचे नेमके कारण म्हणजेच मानसिक , भावनिक, शारिरीक कारण शोधून त्यावर होमिओपॅथिक उपचार केले तर नक्कीच हा त्रास कमी होऊ शकतो..
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ प्रधान होमिओपॅथी अकोला
9881447181
ONLINE VIDEO CONSULTATION AVAILABLE
To book your appointment call / whats app on above contact no.
No comments:
Post a Comment