Tuesday, 13 October 2020

लठ्ठपणा (obecity) आणि होमिओपॅथिक उपचार

 *लठ्ठपणा (obecity) आणि होमिओपॅथिक उपचार*




शरीराच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरीज जेव्हा सेवन करण्यात येते तेव्हा त्याचे रूपांतर चरबीत होते. सुरुवातीला चरबीच्या पेशी आकाराने वाढतात. जेव्हा आकाराची मर्यादा संपते, त्यानंतर दुस-या पेशी तयार होण्यास सुरुवात होते. अशा प्रकारे चरबीच्या पेशी वाढत जातात व स्थूलपणा येतो. जेव्हा वजन कमी होते. त्या वेळेस चरबीच्या पेशींचा आकार कमी होतो. पण संख्या कमी नाही होत.



*’ लठ्ठपणाची मुख्य कारणे काय आहेत :* 


1. शरीराला काम करण्यासाठी जी ऊर्जा हवी असते ती कॅलरीजपासून मिळते. शरीराच्या गरजेपेक्षा कॅलरीज घेण्यात आल्यास त्या साठवून राहतात व लठ्ठपणास सुरुवात होते. बैठे काम करणा-या लोकांमध्ये लठ्ठपणा जास्त आढळून येतो. जिभेचे चोचले म्हणून जंक फूड, सतत हॉटेलचे, बाहेरचे खाणे, तेल तूप इ चा अतिवापर यामुळे शरीरात गरजेपेक्षा जास्तीच्या कॅलरी जातात व लठ्ठपणाचे कारण ठरतात.


2. *आनुवंशिकता*  हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. विशिष्ट जाती धर्माच्या विशिष्ट खानपान संस्कृतीमुळे त्यांच्यात अनुवंशिकच लठ्ठपणाचा गुणधर्म आढळून येतो.


3. *थॉयरॉइडच्या* आजारामुळे, विशेषत: हायपोथॉयरॉडिझममुळे वजन वाढतेय. 


4. *इन्सुलिनोमा* ज्या रुग्णामधील रक्तातील साखरेचे प्रमाण नेहमी कमी होते (हायपोग्लायसेमिया) अशा रुग्णांना वारंवार खावे लागते त्यामुळेही  वजन वाढते. 


5. *मानसिक आजार*: विशेषत: डिप्रेशन असणा-या रुग्णांना वारंवार काहीतरी खात राहण्याची, जेवण्याची सवय असते. नैराश्य आले की या व्यक्ती दिसेल ते वाटेल तसे खात सुटतात. त्यामुळेही वजन वाढते.  


6. *गरोदरपणा* : स्त्रियांमध्ये गरोदरपणात व नंतर 8 ते 10 किलो वजन वाढते व ते नंतर कंट्रोल न केल्यास तसेच राहते. 

 

7. *पॉलिसायस्टिक ओव्हरीन डिसीझ.*  : मुलीमध्ये हार्मोनल इमबॅलन्समुळे पॉलिसायस्टिक ओव्हरीन डिसीझ ( बीजांडातील गाठीं ) मुळे वजन वाढते, चेहऱ्यावर पिंपल्स, अनावश्यक केस यायला सुरुवात होते. मासिक पाळी अनियमित व त्रासदायक होते.


8. *मेडिकेशन* -कुठलेही त्वचाविकार सौंदर्यसमस्या यासाठी उपचार म्हणून सर्रास घेतली जाणारी स्टेरॉइड, नैराश्य मानसिक आजार यामध्ये घेतली जाणारी अँटीडीप्रेसंट प्रकारची औषधे , तोंडावाटे घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्या (ओ.सी.पी. ) अशा अनेक प्रकारच्या औषधामुळे वजन वाढते.


 *लठ्ठपणाकडे दुर्लक्ष केल्यास काय दुष्परिणाम होतात  : -* 


ब्लड प्रेशर (रक्तदाबाचा त्रास), 

डायबेटीस (मधुमेह) जसे आयुष्यभर राहतात तसेच लठ्ठपणाकडे दुर्लक्ष केल्यास तोही आयुष्यभराचा सोबती होऊन बसतो. खालील  लांबलचक यादी ही दुष्परिणामांची आहे. 

1. दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो. 

2.थकवा लवकर येणे. 

3. दिवसभर सुस्तपणा, कामात उत्साह न वाटणे  

4. श्वास घेण्यास त्रास होणे.  

5. घोरणे. 

6. डायबेटीस  

7. हायपरटेन्शन  

8. गुडघ्यावर अतिरिक्त भारामुळे गुडघेदुखी  

9. कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे. 

10. वंध्यत्व  

11. अनियमित मासिक पाळी 

12. पित्ताशयातील खडे  

13. तळहात तळपायाची आग होणे व मुंग्या येणे. 



*लठ्ठपणातील आहार कसा असावा  :* 


काही सोपे उपाय आहेत. ज्यांनी चांगला फायदा होतो. एकाच वेळी पोटभर जेवणे टाळावे. उदा : जर तुम्ही सकाळी व संध्याकाळी मिळून 4 पोळ्या खात   असाल तर त्या 4 पोळ्या विभागून खाव्यात. रात्रीचे जेवण थोडे हलके घ्यावे. जेवणानंतर एक तास आडवे पडू नये. 

वजन कमी करणे हे एखाद्या दिव्यापेक्ष्या कमी नाही त्यामुळे आपले वजन कमी करण्यासाठी एखाद्या तज्ञ डाएटीशियन व न्यूट्रिशियनिस्ट चे मार्गदर्शन घेणे अधिक फायदेशीर ठरते.


 *हे पदार्थ टाळावेत  : -* तेलकट, तुपकट, शिळे जेवण, बटाटा, भात, दुधाचे पदार्थ (पनीर, बटर, चीज) नॉन व्हेज.


 *या पदार्थांचे सेवन वाढवावे  : -*  सलाड (काकडी, टोमॅटो, बीट, मुळा) कडधान्ये (मूग, मटकी, चवळी) भाज्यांचे सूप



*व्यायाम काय काय करावा  :* सर्वात सोपा परवडणारा आणि अतिशय परिणामकारक व्यायाम म्हणजे (ब्रिस्क वॉकिंग) म्हणजे वेगाने चालणे, जेणेकरुन घाम आला पाहिजे. रोज कमीत कमी 40 मिनिटे ब्रिस्क वॉक घेतला पाहिजे. घाम येणे म्हणजे शरीरातील चरबी (फॅट) जळणे. जितका जास्त घाम येईल तितके चांगले. शक्य असल्यास जिम जॉइन करण्यास हरकत नाही. पण नियमितता असावी व व्यावसायिक प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा. लठ्ठपणा हा ऐकण्यास जितका साधा सरळ वाटतो तितकाच तापदायक. वेळीच उपाय न केल्यास गंभीर स्वरूपाचे परिणाम दिसून येतात. शेवटी आपल्या तब्येतीची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे.

आपले शरिर नियमित केल्या जाणाऱ्या व्यायाम प्रकारांना काही दिवसांनी प्रतिसाद देत नाही त्यामुळे एकच एक व्यायाम करूनही कालांतराने अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत.



*लठ्ठपणावर होमिओपॅथिक उपचार*

वेगवेगळ्या वयोगटातील लठ्ठपणाची कारणे वेगवेगळी असतात. लठ्ठपणाचा प्रकार, कारणे, त्यामुळे जाणवणारे त्रास, या सर्व बाबी पाहून होमिओपॅथिक पद्धतीमध्ये सर्व वयोगटातील स्थूलपणावर औषधी उपलब्ध आहे. तज्ज्ञ आपल्या शारीरिक व मानसिक स्थितीचा विचार करूनच ही औषधी देतात.


होमिओपॅथिक औषधींचे कुठलेही दुष्परिणाम (साइड इफेक्ट्स) नाहीत.

लठ्ठपणा वेळीच ओळखला गेला तर त्याचे संभाव्य परिणाम जसे मधुमेह, हृदयविकार, दमा, कोलेस्टेरॉल, व्हेरीफोज व्हेन्स, हाडांची ठिसुळता, उदासीनता टाळता येऊ शकते. तसेच हे आजार लठ्ठपणासोबत असल्यास या आजारावर सुद्धा नियंत्रण येऊ शकते.


*होमिओपॅथिक औषधांचा दुष्परिणाम होत नसला तरीही या क्षेत्रात चांगले अनुभव असलेल्या तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय होमिओपॅथिक औषधी घेणे कटाक्षाने टाळावे.* अशा संशोधित व शास्त्रीय उपचारपद्धतीचा लाभ रुग्णांनी घ्यायला हवा.

डॉ प्रधान होमिओपॅथी अकोला

ट्रान्सफॉर्म विथ डॉ प्रधान

Google search : Dr. Pradhan homeopathy Akola

Transform with Dr. Pradhan



No comments:

Post a Comment

मायग्रेन का सही इलाज : होमिओपॅथी

 *मायग्रेन कारण, लक्षण और होमिओपॅथी* *माइग्रेन क्या है?* माइग्रेन एक प्रकार का तेज सिरदर्द है। यह घबराहट, उल्टी, या प्रकाश और आवज के प्रति स...