Friday, 17 February 2023

मायग्रेन का सही इलाज : होमिओपॅथी

 *मायग्रेन कारण, लक्षण और होमिओपॅथी*


*माइग्रेन क्या है?*


माइग्रेन एक प्रकार का तेज सिरदर्द है। यह घबराहट, उल्टी, या प्रकाश और आवज के प्रति संवेदनशीलता जैसे लक्षणों के साथ हो सकता है। कई लोगों में यह दर्द सिर के एक तरफ ही महसूस होता है। माइग्रेन एक सामान्य अक्षम मस्तिष्क विकार है।विश्व स्वास्थ्य संगठन का कहना है कि माइग्रेन का सिरदर्द अक्षम करने वाली स्थितियों में शीर्ष 10 में है। माइग्रेन अक्सर युवावस्था में शुरू होता है और 35 से 45 वर्ष की आयु के लोगों को सबसे अधिक प्रभावित करता है। डब्लूएचओ के मुताबिक, यह महिलाओं में ज्यादा आम है, आमतौर पर लगभग 2:1 के कारक द्वारा, हार्मोनल प्रभावों के कारण होता है।


माइग्रेन समान्य सिर दर्द से काफी अलग होता है। इसमे जो दर्द होता है वो काफी तेज होता है, और कभी-कभी बर्दाशत से बाहर हो जाता है।माइग्रेन लोगों को कैसे प्रभावित करता है यह भी अलग-अलग हो सकता है। ये ट्रिगर, गंभीरता, लक्षण और फ्रीक़ुएन्सी की एक श्रृंखला है। कुछ लोगों के हर हफ्ते एक से ज्यादा बार ये होते हैं, जबकि अन्य को कभी-कभार ही होते हैं। बच्चों में, माइग्रेन अटैक कम समय के होते हैं और पेट के लक्षण अधिक प्रमुख होते हैं।वैश्विक अध्ययनों से पता चलता है कि दुनिया की लगभग 1% आबादी को क्रोनिक माइग्रेन हो सकता है।


*माइग्रेन के लक्षण*


माइग्रेन के लक्षण चरणों में होते हैं, जैसे : -

प्रोड्रोम 

सिरदर्द से कुछ घंटे या दिन पहले, माइग्रेन से पीड़ित लगभग 60% लोगों में ऐसे लक्षण दिखाई देते हैं:

- प्रकाश, आवाज या गंध के प्रति संवेदनशील होना

- थकान

- भोजन की लालसा या भूख की कमी

- मनोदशा में बदलाव

- गंभीर प्यास

- सूजन

- कब्ज या दस्त


माइग्रेन के कारण


माइग्रेन के कारण साफतौर पर पता नही है। लेकिन ये दिमाग में होने वाले बदलाव के कारण हो सकते हैं जो इन्हे को प्रभावित करते हैं:-


-नर्वेस कोम्युनिकेशन

-रसायनों का संतुलन

-रक्त वाहिकाएं


आनुवंशिक विशेषताएं भी एक कारण हो सकती हैं, क्योंकि परिवार का इतिहास होना माइग्रेन का एक सामान्य जोखिम कारक है।माइग्रेन से पीड़ित अधिकांश लोगों को आचनाक अटैक आता है, जिसका अर्थ है कि उन्होंने अटैक को ट्रिगर करने के लिए कुछ भी नहीं किया है। इस तरह से कभी-कभी यह रोग व्यवहार करता है। कुछ लोगों को जब  माइग्रेन अटैक आता है जिनका एक पहचान योग्य कारण होता है। हर किसी का अलग-अलग ट्रिगर होते हैं, जिसके कारण माइग्रेन का दर्द शुरु होता है। आज की सोच यह है कि एक माइग्रेन की संभावना तब शुरू होती है जब अति सक्रिय तंत्रिका नर्व्स सेल संकेत भेजती हैं जो आपके ट्राइजेमिनल सेल को ट्रिगर करती हैं, जो आपके सिर और चेहरे को सनसनी देती है। यह आपके शरीर को सेरोटोनिन और कैल्सीटोनिन जीन-संबंधित पेप्टाइड (सीजीआरपी) जैसे रसायनों को छोड़ने का संकेत देता है। सीजीआरपी आपके दिमाग की परत में रक्त वाहिकाए सूज जाता है। फिर, न्यूरोट्रांसमीटर सूजन और दर्द का कारण बनते हैं। लेकिन कुछ सामान्य कारण हैं जो बड़ी संख्या में लोगों को प्रभावित करते हैं। सामान्य ट्रिगर में तनाव, कुछ खाद्य पदार्थ, भोजन छोड़ना, शराब, बहुत अधिक या बहुत कम सोना, मौसम में बदलाव या बैरोमीटर का दबाव, महिलाओं में हार्मोनल बदलाव, और दर्दनाक मस्तिष्क की चोटें शामिल हैं। जबकि माइग्रेन किसी भी लिंग, उम्र, जाति, जातीयता या पृष्ठभूमि के लोगों को प्रभावित कर सकता है, यह महिलाओं में विशेष रूप से आम है।


माइग्रेन के ट्रिगर का कारण 


1. हार्मोनल परिवर्तन, उदाहरण के लिए, मासिक धर्म के समय के आसपास।

2. भावनात्मक ट्रिगर, जैसे तनाव, अवसाद, चिंता और उत्तेजना।

3. आहार संबंधी कारक, शराब, कैफीन, चॉकलेट, पनीर, खट्टे फल, और टाइरामाइन युक्त खाद्य पदार्थो।

4. दवाएं, जैसे नींद की गोलियां, हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी (एचआरटी), और कुछ गर्भनिरोधक गोलियां।

5. पर्यावरणीय कारक, टिमटिमाती स्क्रीन, तेज गंध, सेकेंड हैंड स्मोक, तेज आवाज, भरे हुए कमरे, तापमान में बदलाव और तेज रोशनी।


*होम्योपैथी में माइग्रेन का इलाज कैसे होता है -*


माइग्रेन और सिरदर्द के होम्योपैथिक उपचार को काफी अच्छा माना जाता है, क्योंकि ये माइग्रेन करने वाले कारण को ठीक करता है। सिरदर्द के लिए सही होम्योपैथिक दवा चुनने के लिए, अलग-अलग कारक पर ध्यान देना और उनका अवलोकन करना चाहिए। ध्यान देने योग्य सबसे मुख्य कारक हैं, सिरदर्द होने का समय और सिरदर्द को उत्तेजित करने वाले कारण। इसके बाद दर्द होने की जगह पर ध्यान दिया जाता है।


ज्यादातर मामलों में, लोगों को सिर की एक ही तरफ दर्द होता है, जो नीचे की तरफ गर्दन की मांसपेशियों तक फैलता है। इसके अलावा, दर्द की भावना या उसके प्रकार को भी ध्यान में रखा जाता है। कुछ लोगों को तेज दर्द होता है और ऐसा महसूस होता है, जैसे कोई उनके सिर में छुरा भौंक रहा हो। कुछ लोगों को सिर फटने वाला दर्द होता है, जो अन्यजगहों पर भी फैल जाता है। होम्योपैथिक दवा देने से पहले, दर्द के अलावा इसके साथ होने वाले अन्य लक्षणों का भी ध्यान रखा जाता है। सामान्य तौर पर किए जाने वाले उपचार के विपरीत, होम्योपैथी में लक्षण के कारण को ठीक किया जाता है, जिससे दोबारा ये समस्या होने से बचाव होता है।


संपर्क : 

डॉ. प्रधान होमिओपॅथी

भागीरथी कॉम्प्लेक्स, दुर्गा चौक, अकोला. ४४४००३

अपॉइंटमेंट व ऑनलाइन कॅन्सलटेशन साठी संपर्क : 

9881447181


Thursday, 16 February 2023

लहान मुलांमधील काही वेगळे मानसीक आजार व होमिओपॅथी उपचार

 लहान मुलांमध्ये काहीशा वेगळया स्वरूपात आपल्याला ही लक्षणे दिसतात. 


-अस्वस्थता, 

-प्रमाणाबाहेर वेगाने हालचाली करणे (Hyperactive), 

-तोंड वेडेवाकडे करणे, 

-तोतरेपणा व इतर श्वसनीय अडथळे, 

-नखे चावणे, 

-झोपेत दात खाणे, 

-झोपेत चालणे, 

-मनस्तापी वर्तन करणे, 

-सारखी भीतिदायक स्वप्ने पडून घाबरून उठणे, 


यासारख्या गोष्टींकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. आजूबाजूच्या परिस्थितीबरोबर जुळवून घेण्यास अयशस्वी झालेली मुले या प्रकारची लक्षणे दाखवतात. या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यास कालांतराने काहीशा गंभीर स्वरूपातील लक्षणे आपल्यापुढे उभे राहू शकतात. त्यांचे मनोविकारामध्ये रूपांतर होऊ शकते.

आई-वडिलांचे परस्परांशी संबंध जर समाधानकारक नसतील, तर अशी मुले स्वतःला भावनिकदृष्टया असुरक्षित समजतात. विनाकारण रुसणे, साध्या साध्या गोष्टीला घाबरणे, भित्रेपणा, विनाकारण तासन्तास रडणे, या गोष्टींतून भावनिक असुरक्षितता व्यक्त होते.

आई-वडिलांच्या अतिनियंत्रणामुळे व अभ्यासाच्या अतिदबावामुळे, वयाला न झेपणाऱ्या शिक्षेमुळे ते उदास, घुमे, एकलकोंडे बनते व नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्यातही फारसे प्रगत नसते. मनोविकार सुरू होण्यासाठी अशा गोष्टी मनोविकाराचा पाया ठरू शकतात.

प्रशंसा, कौतुक मिळालेले मूल किंवा दोन भावंडांपैकी एकाच्या मनात जर नाकारलेपणाची भावना आली, तर ते सुरुवातील उदास बनते व परिस्थितीशी जुळवून न घेता आल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू शकते. मग शाळेत लहान चोऱ्या करणे, शिक्षकांशी व घरातील मोठया व्यक्तीबरोबर उध्दट वर्तन करणे, सारखी धुसफूस करणे अशा गोष्टी ते करू लागते.

अशा परिस्थितीत मुलाच्या सर्वांगीण विकासाठी आपण होमिओपॅथी या शास्त्राची मदत घेऊन आपले मूल आत्मविश्वासपूर्ण व धीट बनवू शकतो.


संपर्क : 

डॉ. प्रधान होमिओपॅथी

भागीरथी कॉम्प्लेक्स, दुर्गा चौक, अकोला. ४४४००३

अपॉइंटमेंट व ऑनलाइन कॅन्सलटेशन साठी संपर्क : 

9881447181 

लहान मुलांमधील मानसिक आजार व होमिओपॅथी उपचार

 होमिओपॅथी हे शास्त्र सर्व शास्त्रांत तसे नवीनच. आयुर्वेद, ऍलोपॅथी या इतर शास्त्रांनंतर, सर्वात शेवटी शोध लागलेले शास्त्र. (Most Updated & latest.) डॉ. सॅम्युअल हनेमन यांनी या शास्त्राचा शोध लावला. *होमिओपॅथिक उपचारामध्ये व्यक्तीतील वेगळेपणा (शारीरिक, मानसिक व भावनिक) पाहून त्यांना जुळून येणारी औषधी दिली जाते.* या औषधी पोटंटायजेशन या क्रियेद्वारे त्यातील औषधी गुणधर्म वाढवले जाऊन प्रत्यक्ष औषधाचा अर्क कमी होत जातो. त्यामुळे होमिओपॅथिक औषधांचा परिणाम खोलवर (जनुकीय व पेशीय स्तरावर) होऊन औषधांमुळे होणारा दुष्परिणाम व्यक्तीवर न होता फक्त रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये होतो आणि बिघाड निर्माण झालेली शारीरिक व मानसिक क्रिया पूर्ववत सुरळीत होते. मनोविकार हा तर होमिओपॅथी या शास्त्राचा गाभा आहे. या शास्त्रानुसार कुठलाही आजार आधी मानसिक स्तरावर सुरू होऊन मग शारीरिक स्तरावर प्रकट होतो. वेगवेगळया भावनांचे प्रकटीकरण ही प्राण्याची नैसर्गिक गरज आहे. राग, द्वेष, दु:ख, प्रेम, अपमान, आकर्षण, वाईट वाटणे या अगदी सहजभावना आहेत. परंतु मनुष्यप्राणी मात्र आपल्या ठिकाणी असलेल्या बुध्दीचा उपयोग करून या नैसर्गिक भावना व्यक्त न करता अप्रकट स्वरूपातच ठेवत आहे. परिणामी, व्यक्त होऊ पाहणाऱ्या भावना व त्यांना दाबून ठेवण्यासाठी प्रयत्नात असलेला व्यक्ती या संघर्षात वेगवेगळया शारीरिक व्याधींच्या स्वरूपात त्यांची परिणती होत असते.

कुठलाही रोग हा आनुवंशिकरीत्या जरी संक्रमित केला गेलेला असला, तरी मानसिक स्तरांवरील काहीतरी बदलानंतरच तो प्रकट स्वरूपात त्रास द्यायला सुरुवात करतो. समजून घेण्यास अवघड वाटत असले तरीही होमिओपॅथी हे शास्त्र जाणून घेण्यासाठी त्याचे मूलगामी विचार समजावून घेणे महत्त्वाचे आहे.

सतत कुठल्यातरी विचारात असणे, सारखे दचकणे, अतिस्वच्छता (सारखे हात धुणे, इ.) विनाकारण बेचैनी, अस्वस्थता, स्थिरता नसणे, हातापायांची सारखी विनाकारण चाललेली हालचाल, अकारण भीती वाटणे, वाईट स्वप्न पडणे, सारखे नकारात्मक विचार डोक्यात येणे, विनाकारण घाई घाई करणे, स्वत:शी बडबड करणे, मनात कुढत बसणे, आत्महत्येचे विचार मनात येणे ही मनोविकाराची सुरुवातीची काही प्रमुख लक्षणे सांगता येतील.


संपर्क : 

डॉ. प्रधान होमिओपॅथी

भागीरथी कॉम्प्लेक्स, दुर्गा चौक, अकोला. ४४४००३

अपॉइंटमेंट व ऑनलाइन कॅन्सलटेशन साठी संपर्क : 

9881447181

सोरायसिस व होमिओपॅथी उपचार

 सोरायसिस (Psoriasis) हा एक असा त्वचाविकार आहे, जो तुम्हाला हात, पाय, पाठीवर अथवा केसांमध्ये जाणवतो. जरी याचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसत असला तरी त्याचा गंभीर परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर होत असतो. या रोगामध्ये त्वचापेशीची अतिरिक्त आणि जलद गतीने वाढ होते. ज्यामुळे त्वचेवर लालसर पापुद्रे निर्माण होतात. काहींच्या त्वचेवर यामुळे लालसर चट्टे निर्माण होतात. त्वचेला प्रंचड खाज येते. काही संधोशनात असं आढळलं आहे की, सोरायसिस हा संक्रमणातून होणारा आजार नसून तो तुमच्या *प्रतिकार शक्तीमध्ये* होणाऱ्या बदलातून निर्माण होतो. आपल्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाऊन नवीन पेशी निर्माण होण्यासाठी जवळजवळ 28 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र सोरायसिस झालेल्या लोकांमध्ये चार ते पाच दिवसांमध्ये नवीन पेशींची निर्मिती होते. ज्यामुळे त्वचेवर या नवीन त्वचापेशींचा थर जमा होऊ लागतो. पुढे त्याचे रूपांतर खाज, लालसरपणा, चट्टे यामध्ये होत जातं. सोरायसिस हा गंभीर त्वचा रोग असल्यामुळे याबाबत तुम्हाला आधीच सर्व काही माहीत असणं आवश्यक आहे.


सोरायसिस लक्षणे


सोरायसिस हा त्वचारोग होण्यामागची कारणं आणि त्याचे प्रकार वेगवेगळे असल्यामुळे तुम्हाला त्याची प्राथमिक लक्षणे आधीच माहीत असायला हवी. ज्यामुळे यावर लवकर निदान करणे शक्य होईल. यासाठी जाणून घ्या सोरायसिस लक्षणे


त्वचेला खाज येणे (Itchiness)

सोरायसिसचे लक्षण प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे असू शकते. मात्र साधारणपणे सर्वांनाच या त्वचा विकारा मध्ये त्वचेवर भयंकर खाज येते. एवढंच नाही तर अती खाजवण्यामुळे त्वचेचे पापुद्रे निघतात आणि त्वचेवर सूज दिसू लागते. 


कोरडी आणि भेगाळलेली त्वचा (Cracked And Dry Skin)

त्वचेवर नवीन होणाऱ्या त्वचापेशींचा थर जमा झाल्यामुळे त्वचेचं योग्य पोषण होत नाही आणि त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. काही जणांमध्ये त्वचेवर भेगा पडलेल्या दिसू लागतात तर काहींची त्वचा या रोगामध्ये कोरडी झाल्यामुळे तिचे पापुद्रे सुटू लागतात. 


स्काल्पमध्ये खाज (Scaly Scalp)

सोरायसिस हा आजार केसांमध्येदेखील होत असल्यामुळे त्यामुळे तुमच्या स्काल्प लालसर होतो. केसांमध्ये लालसर आणि जाडसर चट्टे उठतात, केसांमध्ये कोंड्याप्रमाणे पांढरा पदार्थ तयार होतो. स्काल्प कोरडा झाल्यामुळे केसांचे नुकसान होते, केस भरपूर प्रमाणात गळू लागतात. त्वचेला प्रंचड खाज येते आणि दाह जाणवतो.


त्वचेतून येणाऱ्या वेदना (Skin Pain)

सोरायसिसमध्ये त्वचेला खूप खाज येते ज्यामुळे त्वचेमध्ये दाह निर्माण होतो आणि जळजळ जाणवते. सहाजिकच या दाह आणि वेदनेतून मुक्तता मिळावी असं रोग्याला वाटू लागतं. या त्वचारोगाने गंभीर रूप धारण करू नये यासाठी खाज आल्यावर त्वचा हाताने खाजवू नका.


नखे ठिसूळ होतात (Pitted Nails)

जर तुम्हाला नखांचा सोरायसिस झाला तर यामुळे तुमची नखे ठिसूळ होतात. नखांच्या वरील आवरण हे केरॅटिन सेल्समुळे कठीण असते. मात्र या रोगात तुमच्या या नखांच्या पेशींचे नुकसान होते आणि नखे ठिसूळ आणि भेगाळतात. नखांचा आकार, जाडसरपणा आणि रंग नेहमीपेक्षा वेगळा दिसू लागतो. नखं ठिसूळ झाल्याने पटकन तुटतात. 


सांधे दुखी (Joint Pain)

सोरायसिस तीव्र झाल्यास त्यामुळे तुम्हाला सोरायटिक आर्थ्राटीसचा त्रास जाणवू शकतो. सोरायटिक आर्थ्राटीसमुळे तुमच्या सांध्यावर वाईट परिणाम होतो. तुमच्या एक अथवा दोन्ही बाजूचे सांधे यामुळे दुखावले जाऊ शकतात. यामुळे हाता-पायाच्या सांध्यामध्ये सूज आणि वेदना होतात. वेदनेची तीव्रता इतकी वाढत जाते की यामुळे तुम्हाला दैनंदिन कामे करणेही कठीण होते.


सोरायसिसची कारणे (Psoriasis Causes In Marathi)

सोरायसिस होण्यामागची कारणे प्रत्येक व्यक्तामागे वेगवेगळी असतात. त्यामुळे सोरायसिस होण्यामागचं नेमकं कारण कुणीच सांगू शकत नाही. मात्र ही काही कारणं आहेत ज्यामुळे सोरायसिस होऊ शकतो.


अनुवंशिकता (Hereditary)

काही संशोधनात असं आढळलं आहे की जर एखाद्याच्या आई-वडीलांना, आजी-आजोबांना अथवा भावंडांना सोरायसिस झाला असेल तर त्या व्यक्तीला सोरायसिस होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत जास्त असतो. यामागे त्यांच्यातील अनुवंशिकता कारणीभूत असू शकते. जरी तुमच्यामध्ये अनुवंशिक गुण असले तरी वातावरणातील बदलामुळेच हे गुणधर्म कार्यान्वित होतात. त्यामुळे जोपर्यंत वातावरणात असे बदल होत नाहीत तो पर्यंत सोरायसिस त्या व्यक्तीमध्ये सहज विकसित होत नाही.


त्वचेवरील जखमा (Injury To The Skin)

जर तुमच्या त्वचेवर कापल्याच्या, ओरखडे उठल्याच्या, कीटकदंशाच्या, एखाद्या इनफेक्शनच्या जखमा असलीत तर अशा स्थितीत सोरायसिस बळावण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे त्वचेवरील अशा गंभीर जखमा हे देखील सोरायसिस होण्यामागचं एक कारण असू शकतं. बऱ्याचदा गंभीर प्रमाणात झालेलं सनबर्नही सोरायसिस होण्यामागचं एक कारण असू शकतं. त्यामुळे जर तुमच्या त्वचेवर अशा जखमा असतील तर त्यावर त्वरीत योग्य ते उपचार करा.


सुर्यप्रकाश (Sunlight)

मानवी शरीराच्या वाढ आणि विकासासाठी योग्य प्रमाणात सुर्यप्रकाश मिळण्याची आवशक्ता असते. कारण सुर्यप्रकाशातून शरीराला व्हिटॅमिन डीचा पूरवठा होत असतो. मात्र नैसर्गिक सुर्यप्रकाश हा प्रमाणातच मिळणं गरजेचं आहे. शिवाय सकाळचे कोवळे ऊनच त्वचेसाठी उपयुक्त असते. त्यानंतरचे प्रखर ऊन त्वचेसाठी उपयुक्त तर ठरत नाही उलट अपायकारक ठरू शकते. अशा प्रखर सुर्यप्रकाशामुळेही सोरायसिस होऊ शकतो, शिवाय ज्यांना आधीच सोरायसिस आहे त्यांच्यासाठी सुर्यप्रकाश हानिकारक ठरू शकतो.


औषधे (Drugs)

काही औषधे आणि स्टिरॉईडच्या वापरामुळेही शरीरात दाह आणि जळजळ निर्माण होते. ज्याचा परिणाम त्वचेवर सोरायसिस होण्यावर होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही घेत असलेल्या औषधांमुळे अथवा स्टिरॉईडमुळे तुम्हाला त्वचेवर गंभीर लक्षणे जाणवू लागली तर अशी औषधे घेणे त्वरीत थांबवा. शिवाय याबाबत डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या.


भावनिक ताणतणाव (Emotional Stress)

सोरायसिस हा आधीच सांगितल्याप्रमाणे तुमच्या प्रतिकार शक्तीशी निगडीत होणारा एक त्वचा रोग आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या भावनिक ताणतणावात असता तेव्हा त्याचा परिणाम नकळत तुमच्या प्रतिकार शक्तीशी येत असतो. काही संधोधनात असं आढळून आलं आहे की मानसिक अथवा भावनिक ताणतणावामुळे गंभीर आजार निर्माण होऊ शकतात. सोरायसिसदेखील तुमच्या भावनिक ताणाचा एक परिणाम असू शकतो.


Emotional Stress

हॉर्मोनल बदल (Hormonal Changes)

किशोरवयात मुला-मुलींच्या शरीरात अनेक बदल होतात. या काळात होणाऱ्या हॉर्मोनल बदलाचा एक परिणाम म्हणज सोरायसिस असू शकतो. महिलांमध्ये मॅनोपॉजच्या काळातही असेच परिणाम शरीरात दिसू लागतात. काही महिलांमध्ये गरोदरपणात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांमुळे त्वचेवर हा गंभीर त्वचाविकार जाणवतो. कधी कधी ही लक्षणे काही काळापूरती कमी होतात मात्र पुन्हा जेव्हा शरीरात हॉर्मोनल बदल जाणवतात तेव्हा ती पुन्हा दिसू लागतात.

व्यसन (Smoking And Alcohol)

ज्या लोकांना अती धुम्रपान आणि मद्यपानाचे व्यसन असते अशा लोकांमध्ये सोरायसिस होण्याचा धोका जास्त जाणवतो. तुमच्या घरात कुणी सातत्याने धुम्रपान करणारी व्यक्ती असेल तरीही तुम्हाला सोराससिस होऊ शकतो. अशा लोकांना लक्षणे लवकर जाणवत नाहीत शिवाय आजार  लवकर पूर्ण बराही होत नाही. यासाठीच जर तुम्हाला अशी व्यसने असतील तर त्यापासून लवकरात लवकर स्वतःला मुक्त करा. कारण सोरायसिस झाल्यावर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच दक्षता घेणं नेहमीच योग्य ठरेल.


होमिओपॅथी उपचार

शरीराचे बाह्यावरण असणारी, बाहेरील रोगजंतू, इतर आक्रमक इत्यादींपासून शरीराला वाचवणारी, शरीराचे उत्सर्जनकार्य (घाम वगैरे) करणारी, शरीराचे तापमान राखणारी, स्पर्शज्ञान देणारी, चरबी साठवून ठेवणारी, सौंदर्य राखणारी यासारखीच अनेक कामे करणारी त्वचा ही शरीराच्या रक्तसंस्थेशी, चेतासंस्थेशी (autonomic nervous systemशी), ग्रांथीसंस्थेशी निगडित असतेच. म्हणजेच माणूस आजारी पडण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अक्षाशी त्वचा संस्था जवळून संबंधित आहे. म्हणजेच त्वचाविकार हे केवळ त्वचेच्या लक्षणांपुरते (signs and symptoms) मर्यादित नसून त्याचा खोलवर शरीर आणि मन ह्या दोघांशीही संबंध आहेच. माणसाचा आहार, त्याचे राहणीमान, दैनंदिन स्वच्छतेच्या व इतर सवयी ह्याही ह्याच आजारांशी संबंधित आहेतच.

औषध देताना त्वचाआजाराचा इतका सखोल, विस्तारात (Holistic) विचार केल्यानंतरच होमिओपॅथी त्वचाआजार मुळापासून बरे करू शकत.


संपर्क : 

डॉ. प्रधान होमिओपॅथी

भागीरथी कॉम्प्लेक्स, दुर्गा चौक, अकोला. ४४४००३

अपॉइंटमेंट व ऑनलाइन कॅन्सलटेशन साठी संपर्क : 

9881447181


मायग्रेन का सही इलाज : होमिओपॅथी

 *मायग्रेन कारण, लक्षण और होमिओपॅथी* *माइग्रेन क्या है?* माइग्रेन एक प्रकार का तेज सिरदर्द है। यह घबराहट, उल्टी, या प्रकाश और आवज के प्रति स...