Tuesday, 13 October 2020

थायरॉईड संबंधी आजार आणि होमिओपॅथी उपचार

 थायरॉईड संबंधी आजार आणि होमिओपॅथी उपचार

डायबेटीस, शुगर यांच्या पाठोपाठ थायरॉईडचे आजार हे आता आपल्या आजूबाजूला मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. हायपोथायरॉईड म्हणजे लठ्ठपणाचा थायरॉईड व हायपरथायरॉईड म्हणजे वजन कमी होण्याचा थायरॉईड हे आता सर्वांनाच माहिती झाले आहे. एकदा या आजाराचे निदान होऊन गोळ्या सुरू झाल्या की आयुष्यभर त्या घेत राहणे एवढेच आपल्या हातात असते. थायरॉईडच्या आजारात होमिओपॅथी उपचार तुलनेने जास्त फायदेशीर ठरतात.


थायरॉईड आजाराची पाश्वभूमी, कारणे, लक्षणे, व होमिओपॅथी उपचार याबद्दल माहीती आपण या लेखात घेऊ.


भारतातील जवळजवळ ४.२ करोड लोकांना कोणता ना कोणता थायरॉईडचा त्रास आहे आणि यापैकी ६० टक्के लोकांना त्याची कल्पनासुद्धा नाही. 


तसेच, असे मानले जाते की *पुरुषांपेक्षा महिलांमध्ये या विकाराचे प्राबल्य अधिक आहे.* कारण मुली, स्त्रीया, महिलांना पुरुषांपेक्षा वेगळ्या प्रकारच्या ताणतणावाला सतत सामोरे जावे लागते. लहानपणी वडिलांचा घरातील मोठ्यांचा धाक, शाळेमध्ये शिक्षकांचा धाक, कॉलेजमध्ये अभ्यास, करिअर, जॉब, रॅगिंग किंवा इतर प्रकारचा ताण, रिलेशनशिपमधील ताण, लग्नानंतर सासरच्या वातावरणात जुळवून घेताना येणारा ताण, जोडीदारासोबतच्या संबंधातील तणाव, नोकरदार मुलींमध्ये शिफ्टमधील नोकरी, प्रवास, पोलीस, कॉल सेंटर, इंजिनिअर, फिल्ड जॉब अशा पुरुषांच्या समजल्या जाणाऱ्या नोकऱ्या करताना येणार मानसिक व शारीरिक ताण, गृहिणीमध्ये घरकाम, मुलांचा अभ्यास, शाळा इ संबंधी ताण, कौटुंबिक, आर्थिकअडचणीमुळे येणारा ताण आपल्या थायरॉइड ग्रंथींवर नकळत जोर देत असतो. सततच्या या तणावामुळे महिलांना हायपो थायरॉईड हा आजार जास्त प्रमाणांत दिसून येतो.


*थायरॉईड विकाराचे एक मुख्य कारण आहे आपण जगत असलेली तणावपूर्ण जीवनशैली.* स्त्री जशी पुरुषाच्या बरोबरीने किंबहुना वरचढ नोकरी व्यवसायात ठरू लागले तश्या स्त्रीच्या हार्मोनल समस्या जसे थायरॉईड, पीसीओएस, रक्तदाब, मधुमेह, हृदय विकार इ आजार वाढत आहेत.

 

आज थायरॉईड विकाराचा फैलाव जरी वाढत असला तरी रोग्यांना *होमिओपॅथिक उपचाराचा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.* थायरॉइड चे निदान एकदा झाले की सुरू होणारी इतर औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात त्या तुलनेत होमिओपॅथी औषध कमी काळ घायवे लागते.



थायरॉईड विकाराचे अनेक प्रकार आहेत पण दोन प्रकार सर्वात प्रचलित आहेत:


🔴हायपोथायरॉईडझम (अंतर्गत सक्रीय थायरॉईड) |Hypothyroidism (underactive thyroid)


🔴कमालीचे थायरॉईडझम (अतिक्रियाशील थायरॉईड) | Hyperthyroidism (overactive thyroid)


तुम्हाला कोणत्या प्रकारचा विकार जडलेला आहे त्याबाबतीत डॉक्टरांकडून माहिती करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. तसेच तुम्ही अनुभवत असणाऱ्या प्रत्येक विशिष्ट लक्षणांनासुद्धा तुम्ही तपासून घेऊ शकता परंतु सर्वप्रथम डॉक्टरांकडून नक्की खात्री करून घ्या, कारण पुढील उपचार सुरु करण्या अगोदर डॉक्टरच तुम्हाला व्यवस्थित वैद्यकीय तपासणीचा सल्ला देतील.


 हायपोथायरॉईड​ या प्रकारात दिसून येणारी लक्षणे :


🔸जर तुम्ही हळूहळू दैनंदिन जीवनाच्या बाबतीत उदासीन होऊ लागलात, तुमच्यात अनुत्साह जाणवू लागला आणि सगळ्या गोष्टींच्याबाबतीत तुम्ही निरुत्साही राहू लागलात.


🔸तुम्ही नित्याचीच कामे करीत असलात तरीसुद्धा तुम्हाला नेहमीपेक्षा अतिथकवा वाटू लागतो.


🔸आजकाल तुम्हाला मलावरोध का होतो हे तुम्हाला अजिबातच कळत नाही.


🔸तुमचे अचानक वजन वाढल्याचे तुमच्या मित्रांच्या लक्षात येऊ लागते आणि त्याचे कारण तुम्ही देऊ शकत नाही कारण तुम्ही स्वतःच आश्चर्यामध्ये आहात की अति आहार न घेतासुद्धा वजन कसे काय वाढले आहे ?


🔸हल्ली आरश्यात बघितल्यावर तुमच्या लक्षात येते की तुमचा चेहरा सुजलेला दिसतो आहे.


🔸तुमचे लांब जाड केस अचानक गळू लागले आहेत आणि घरभर केसांचे पुंजके पडलेले दिसू लागतात आणि  हे बघून तुम्ही चिंतीत होता.


🔸अनियमित मासिक पाळी (याची आणि इतर कारणेसुद्धा असू शकतात, डॉक्टरांकडून तपासून घेणे उत्तम राहील.


🔸तुमच्या चेहऱ्यावर केसांची लव इतक्या अतिप्रमाणात दिसू लागली आहे की त्याची तुम्हाला लाज वाटू लागली आहे.


🔸तुमच्या घश्याला सूज आलेली तुम्हाला दिसते आहे. आता नक्कीच डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आलेली आहे.


हायपरथायरॉईड या प्रकारात दिसून येणारी लक्षणे : 

🔸 दैनंदिन जीवनाच्या बाबतीत अतिचंचलता, चलबिचल, अस्वस्थहोऊ लागलात, तुमच्यात अतिउत्साह जाणवू लागला आणि सगळ्या गोष्टींच्याबाबतीत तुम्ही घाई करायला लागलात तर.


🔸तुम्ही नित्याचीच कामे एकापाठोपाठ एक न थकता  करीत असलात, 


🔸वारंवार शौचास जाण्याची इच्छा होणे व जावे लागणे. वारंवार जाऊनही समाधान न होणे.  


🔸सतत अकारण चिडचिडेपणा, घबराट, छातीत धडधड, झोप न येणे अशी लक्षणे


🔸तुमचे अचानक वजन कमी झाल्याचे तुमच्या मित्रांच्या लक्षात येऊ लागते आणि त्याचे कारण तुम्ही देऊ शकत नाही. कारण तुमची तहान, भूक तर वाढलेली असते.



🔸हल्ली आरश्यात बघितल्यावर तुमच्या लक्षात येते की तुमचा चेहरा सुकलेला निस्तेज व त्वचा कोरडी पडलेली दिसत आहे.



🔸तळहात गरम वाटणे व तळहात तळपायाला अति जास्त घाम येणे, गरमी जराही सहन न होणे.


🔸बुबुळ बाहेर येणे, गळ्यावर सूज गाठ दिसून येणे

 *होमिओपॅथिक उपचार*

------------------------------


एकदा थॉयरॉईडचा विकार जडला की जन्मभर गोळ्या घ्यायला लागतात असा गैरसमज जनमानसामध्ये पसरला आहे.


 *विशेष करून आजाराच्या पहिल्या टप्प्यातच होमिओपॅथिक उपचार घेतला तर अत्यंत लाभकारक सिद्ध होतो.*

थायरॉईड साठी इतर उपचार चालू असताना सुद्धा होमिओपॅथी उपचार घेता येतात. अश्यावेळी आधीच्या सुरू असलेल्या औषधासोबत होमिओपॅथी औषध सुरू ठेवल्यास हळूहळू आधिच्या गोळ्या कमी कमी करत बंद होतात. 


 *ग्रंथीच्या आतमध्ये असणारी सूज होमिओपॅथिक औषधांनी कमी होऊन जाते व तुम्ही पूर्ववत आयुष्य जगू शकता.*


*होमिओपॅथिक औषध तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये असणारे दोष नाहीसे करतात व त्यामुळे तुमचे थॉयरॉईड पूर्ववत काम करायला लागते.* दैनंदिन आयुष्यातल्या ताण तणावास सकारात्मकतेने सामोरे जाण्याची आंतरिक शक्ती होमिओपॅथी उपचार आपल्यात निदान करतात त्यामुळे थायरॉईड च्या आजाराचे समूळ उच्चाटन होऊन आपण निकोप, निरोगी, निरायम आयुष्य जगू शकता.

डॉ. प्रधान होमिओपॅथी

दुर्गा चौक

अकोला

9881447181

Search Dr. Pradhan homeopathy Akola on Google and like, comment, rate, follow us on Facebook, instagram, twitter..



*होमिओपथी मध्ये थायरॉईड साठी अत्यंत गुणकारी औषधे उपलब्ध आहेत.*


*या औषधींचे चयन तुमच्या आजाराच्या लक्षणानुसार केले जाते. त्यामुळे तुमच्या होमिओपॅथिक तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधी घेऊ नयेत.*

No comments:

Post a Comment

मायग्रेन का सही इलाज : होमिओपॅथी

 *मायग्रेन कारण, लक्षण और होमिओपॅथी* *माइग्रेन क्या है?* माइग्रेन एक प्रकार का तेज सिरदर्द है। यह घबराहट, उल्टी, या प्रकाश और आवज के प्रति स...