Thursday, 15 October 2020

भीती / भयगंड (फोबिया) आणि होमिओपॅथिक उपचार Fear / phobia and its cure with homoeopathy

Phobia, homoeopathy in phobia, phobic disorders and homoeopathy fear types and homoeopathic treatment phobia types and cure by homoeopathy

Phobia, homoeopathy in phobia, phobic disorders and homoeopathy fear types and homoeopathic treatment phobia types and cure by homoeopathy

Phobia, homoeopathy in phobia, phobic disorders and homoeopathy fear types and homoeopathic treatment phobia types and cure by homoeopathy

Phobia, homoeopathy in phobia, frar of injection, injury, accident, blood, phobic disorders and homoeopathy fear types and homoeopathic treatment phobia types and cure by homoeopathy

 भीती / भयगंड (फोबिया) आणि होमिओपॅथिक उपचार


माणसाच्या  मनात निर्माण होणारी शारीरिक हानीची , धोक्याची, वा इजा होण्याची पुर्वकल्पना व अनुभवास येणारी भावना म्हणजे भीती होय. 


भीती ही एक भावना आहे त्यामुळे धोक्याची स्पष्ट जाणीव होते.


भीती किंवा फोबिया या आजारामध्ये एखाद्या वस्तूची, प्रसंगाची किंवा वातावरणाची भयंकर भीती वाटते. विशिष्ट फोबियामध्ये एखाद्या वस्तूची किंवा प्रसंगाची भीती वाटते. सोशल फोबियामध्ये लोकांमध्ये जाण्याची आणि लोकं असणाऱ्या वातावरणाची भीती वाटते. त्या वातावरणात किंवा त्या प्रसंगात गेल्यावर त्या व्यक्तीला जीव घाबरा होणे, अस्वस्थ वाटणे, भीती वाटणे, बेचैन होणे असं होतं.


विशिष्ट फोबिया असणाऱ्या व्यक्तींना कुत्रा नुसता दिसला तरी असे वाटते की आपल्याला हा कुत्रा नक्की चावेल मग रेबिज हा आजार होईल, गाडी चालवताना काहीतरी अपघात होईल, लहान मुलांमध्ये एकटे राहण्याची, अंधाराची, काल्पनिक, भुताची, कोणी रागवेल, कोणी मारेल, कोणी बोलेल, काही करेल अशी भीती, काही व्यक्तींना एकदम भीतीचा झटका येतो. वयस्कर व  एकट्या राहणाऱ्या जेष्ठमध्ये असलेल्या आजाराबद्दल भीती जसे हार्ट अटॅक येईल का, पॅरालिसीसचा झटका येईल का चालताना त्यांना असे वाटते की आपला तोल जाईल चक्कर येईल आपण पडू व फ्रॅक्चर होईल किंवा आपल्याला गंभीर असे काहीतरी होईल. या भीतीमुळे या व्यक्ती लिफ्टमध्ये जाणे-येणे करू शकत नाहीत किंवा कोणत्याही बंद ठिकाणी राहू शकत नाहीत. आपल्याला झटका आला तर हॉस्पिटलला घेऊन जाणार कोण, या भीतीने ते बस, ट्रेनने एकटे प्रवास करत नाहीत. घरात बसून राहतात, कुठेही जात नाहीत. कुठे जाणे खूपच आवश्यक असेल तर कुणाला तरी कायम सोबत ठेवतात.  माझ्याकडे असे पेशंट आले आहेत की, भीतीमुळे ते लोक चार-चार वर्षे घराबाहेर एकटे गेलेले नाहीत. आणि उपचारानंतर ते पूर्णपणे नॉर्मल व्यक्तीसारखे जीवन जगत आहेत. सामाजिक भयगंड असणाऱ्या व्यक्तींना असे वाटते की समाजामध्ये आपण गेल्यावर आपला अपमान होईल. लोकं कमी लेखतील. एखादया गोष्टबद्दल विनाकारण लोक समाज काय म्हणेल ? नावं ठेवील या भीतीमुळे ते कोठेही जात नाहीत किंवा गेले तर लोकांशी बोलत नाहीत. या लोकांना स्टेजवर जाण्याची, बोलण्याची भीती असते, सार्वजनिक ठिकाणी टॉयलेट करायला भीती वाटते. इतर स्त्री किंवा पुरुषांबरोबर बोलायला भीती वाटते. सामाजिक भयगंड असणाऱ्या व्यक्तींना समाजातील कोणत्याही वातावरणाची भीती वाटते. पाच ते दहा टक्के लोकांना भयगंड हा आजार असतो. यामध्ये व्यक्तींना हे माहीत असतं की ही भीती अनावश्यक आहे तरीपण त्या व्यक्ती ते वातावरण टाळतात आणि नेहमी भयग्रस्त राहतात.


सहसा दिसून येणारे भीतीचे विविध प्रकार


प्राण्यांची भीती -

 उदा. मांजर, कुत्रा, पाल, साप, झुरळ, उंदीर, किडे


वातावरण -

अंधार, वादळ, वारा, पाऊस, उंच पुल, नदी, 


- कार, ट्रेन, बस, विमान प्रवास


- रक्त, इंजेक्शन, जखम, अपघात, डेड बॉडी


- लिफ्ट, बंद जागा, गर्दी,

आजार -

असाध्य आजार, एड्स, कुठलीही साधी गाठ असली तरी कॅन्सर, छातीत थोडं दुखलं की हार्टअ‍टॅक, कुठल्याही लक्षणाशी संबंधित एकदम टोकाच्या आजाराची भीती, मरणाची भीती


- उंचीवर जाण्याची, खुल्या जागेची, पाण्याची, बंद जागेची, रस्त्यावरील वाहतुकीची, गर्दीची भीती, आग इत्यादींची भीती.


-शाळेत जाण्याची भीती, व्यासपीठावर जाण्याची भीती, मुलाखतीची भीती, परीक्षेची भीती


वरील प्रकार हे दीर्घकालीन भीतीचे आहेत. आयुष्यातील काही पूर्वानुभवामुळे मेंदूतील त्या त्या संप्रेरकांच्या निर्मितीमुळे वरील प्रकारची लक्षणे दिसून येतात.

एकदम उत्पन्न होणाऱ्या भीतीमध्ये एखाद्या प्रसंगाचा सामना करायची वेळ आल्यास  काही विशिष्ट लक्षणे दिसून येतात यास पॅनिक अटॅक असे म्हणतात. हा अटॅक १० मिनिटे ते एका तासांपर्यंत राहू शकतो. 


यामध्ये 

छाती धडधडणे, 

हात थरथरणे, 

आपल्या जीवाला काही बरे-वाईट असे होईल असे वाटणे, 

घाम येणे, 

श्वास कोंडला जातो असे वाटणे, 

घसा कोरडा पडणे,

छातीत दाब येणे, छातीत दुखणे, 

जीव मळमळणे, 

पोटात गोळा उठणे, 

तोल जातो असे वाटणे, डोके हलके वाटणे, 

डोळ्यांसमोर अंधारी चक्कर येणे, 

आपण कुठल्या तरी नवीन जागी आलो आहोत असे वाटणे, 

आपला स्वतःवरचा ताबा सुटला आहे किंवा आपण वेडे होऊ असे वाटणे, मरतो आहे असे वाटणे, अंगात मुंग्या येणे, 

गरम वाफ निघणे, 

अस्थिरता येणे, 

चलबिचल होणे, 

श्वास घेणे कठीण झाले आहे असे वाटणे, 

गळा भरून येणे अशी लक्षणे दिसतात. 


फोबियामध्ये इतरही लक्षणे दिसतात. ज्यामध्ये झोप न येणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, मन न लागणे, घराच्या बाहेर न पडणे असे होते.


*होमिओपॅथिक उपचार*

भीती म्हणजेच फोबिया साठी होमिओपॅथीमध्ये उत्कृष्ट औषधे आहेत.

 

भीतीमुळे उत्पन्न झालेल्या शारीरिक व मानसिक लक्षणांचा पूर्णतः अभ्यास करून होमिओपॅथिक औषध निवडली जातात.


होमिओपॅथिक औषधांच्या मदतीने आपण भीतीवर तसेंच भीतीमुळे दैनंदिन जीवनावर व शरीरावर होणाऱ्या परिणामावर, आजारावर आपण नक्कीच नियंत्रण मिळवू शकतो. 


तसेच इतर आजारासाठी होमिओपॅथी उपचार घेत असाल तरी डॉ ना आपल्याला वाटणाऱ्या वरील प्रकारच्या अनामिक अनाकलनीय भीतीबद्दल नक्की सांगा. ही लक्षणे आपला इतर कुठला आजारही बरा करण्यासाठी आपल्या डॉ ना मदत करू शकतात.

केस 1 - 58 वर्ष वयाच्या एका शेतकरी व्यक्तीला थोडंही काही लागलं की मला धनुर्वात होणार अशी खूप भीती वाटायची मग डॉ कडे जाऊन इंजेक्शन घ्यायचे. अगदी दर दोन तीन दिवसांनी त्यांना धनुर्वातासाठी इंजेक्शन लागायचे. हे इंजेक्शन एकदा घेतले की तीन महिने परत घ्यायची गरज नसते म्हणून डॉ त्यांना फक्त समाधानासाठी निडल प्रिक करायचे ! शेवटी त्या डॉ नीच त्यांना माझ्याकडे होमिओपॅथी उपचारासाठी पाठवले. होमिओपॅथी औषधी घेतल्यानंतर लगेच त्यांच्यात फरक जाणवायला लागला. धनुर्वाताची भीती पुर्णपणे नाहीशी होऊन इंजेक्शन घेणे बंद झाले !!!


केस 2 

नेहमी सर्दी, ताप, खोकला, कफ, श्वास घेण्यास त्रास होऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागत असलेल्या एका 10 वर्षाच्या मुलाला उपचारासाठी आणले असता केस हिस्ट्री घेताना कशाची भीती वाटते असे विचारले असता  त्याच्या आईने सांगितले की याला कुत्र्याची भीती खूप वाटते. तर मुलगा म्हणाला सर्व कुत्र्याची नाही फक्त काळ्या कुत्र्याची !!! या एका लक्षणावरून त्याच्या नेहमी होणाऱ्या सर्व त्रासापासून त्याची होमिओपॅथी उपचाराने सुटका झाली. गेल्या 2 वर्षात त्याला एकदाही सर्दी, कफ झाला नाही !!!


अश्याप्रकारे होमिओपॅथी तज्ज्ञाकडून योग्य ते उपचार करवून घेतल्यास आपण कुठल्याही प्रकारच्या भीतीवर कायमस्वरूपी मात करुन पूर्णपणे सामान्य जीवन जगू शकतो.


डॉ. प्रधान होमिओपॅथी

दुर्गा चौक, अकोला

9881447181

Like, comment, share, rate us on Facebook page, instagram, google.

Dr. Pradhan homeopathy Akola.


1 comment:

  1. Very nice information. Experienced great results in sush cases with Dr Pradhan sir...

    ReplyDelete

मायग्रेन का सही इलाज : होमिओपॅथी

 *मायग्रेन कारण, लक्षण और होमिओपॅथी* *माइग्रेन क्या है?* माइग्रेन एक प्रकार का तेज सिरदर्द है। यह घबराहट, उल्टी, या प्रकाश और आवज के प्रति स...