Monday, 16 January 2023

गाऊट कारणे लक्षणे आणि होमिओपॅथिक उपचार

गाऊट म्हणजे अंगठ्याचा संधिवात, शरीरातील मूत्रपिंडाचे कार्य बिघडले की जे काही युरिक अ‍ॅसिड मूत्रावाटे बाहेर टाकण्याचे काम मूत्रपिंड करीत असते, त्याच्यावर परिणाम होऊन पूर्णपणे युरिक अ‍ॅसिड लघवीवाटे बाहेर टाकले जात नाही व या युरिक अ‍ॅसिडचे रक्तातील प्रमाणात वाढ होते, रक्तातील युरिक अ‍ॅसिडची नियमित पातळी 3.4 %  या दरम्यान असते. या पातळीपेक्षा रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्यास त्याचे एकावर एक थर साचून खडे तयार होतात. हे खडे मुख्यत्वे पायाच्या अंगठ्याच्या सांधात व गुडघ्यात जास्त प्रमाणात होतात व त्या जागी भयंकर वेदना होतात, सांधा सुजतो, त्यावरील त्वचा लाल व चकचकीत दिसते. वेदनेचे प्रमाण इतके असते की रुग्णाला पायमोजाचा स्पर्शही सहन होत नाही व कसला इतरही जरासा स्पर्श चालत नाही. हा त्रास अचानक सुरू होतो, कधी कधी दोन दिवस तर कधी आठवड्यापर्यंत हा त्रास होऊ शकतो. याला अ‍ॅक्युट अ‍ॅटॅक म्हणतात.

त्यानंतर रुग्ण पूर्वपदावर येतो. पायाच्या अंगठ्याच्या सांध्याशिवाय घोटे, मनगट, कोपर इ. सांध्यामध्येही असे खडे साचून राहून त्रास होऊ शकतो. काही जणांमध्ये हा पुन्हा दुसर्‍यांदा त्रास उद्भवतच नाही. परंतु, काही जणांना मात्र वर्षभराच्या आतच परत अशा प्रकारचा त्रास होतो. परत परत होणार्‍या त्रासामुले सांद्याची झिज होऊन, सांधे लवकर खराब होता. त्यामुळे वेदना दीर्घकाळ राहू शकते.

गाऊट हा पुरुषांमध्येच जास्त प्रमाणात दिसू लागतो. सहजा स्त्री व मुले यांच्यात जास्त आढळून येत नाही. (पण याला अपवाद म्हणजे Secondary Gaut आहे.) काही रुग्णांमध्ये चयापचयातील बिघाडामुळे युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. तर काहींच्यात अनुवंशिक दोष येतात.

1)  Primary Gaut :-  

या प्रकारामध्ये रुग्णाच्या शरीरातच जास्त युरिक अ‍ॅसिड तयार होते. हा प्रकार फक्त पुरुषांमध्येच आढळतो. वयाच्या 20 ते 40 वर्षांमध्ये होतो.

2) Secondary Gaut  :-

काही विशिष्ट औषधांच्या साईड इफेक्टस्मुळे किडनीची युरिक अ‍ॅसिड उत्सर्जीत करण्याची क्षमता कमी होते. हा प्रकार 60-65 वर्षे, वयोवृद्धांमध्ये, स्त्रीयांमध्ये होऊ शकतो.  शक्यतो मांसाहार करणार्‍या, चरबीयुक्त अती खाणार्‍या, आरामदायी बैठे जीवन जगणार्‍यांच्यात या प्रकारचा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो.


लक्षणे :-

भयंकर वेदना होतात,  सुज येते, लाल होते, बोटे वाकडीतिकडी होतात, बोटे वळण्यास त्रास होतो, सांधे आकडतात, उठण्या-बसण्यात त्रास होतो.

तपासण्या :

गाऊटची तपासणी ही रक्तातील युरिक अ‍ॅसिडची तपासणी महत्त्वाची ठरते. तसेच, किडनीची कार्यक्षमता बघण्यासाठी रक्तातील युरिक व क्रियाटिनीन या तपासण्याही महत्त्वाच्या ठरतात. याशिवाय सांध्यांची झीज कितपत झाली आहे, यासाठी सांध्यांची क्ष किरण तपासणी आवश्यक ठरते.

होमिओपॅथिक उपचार :

प्रत्येक गाऊटच्या रुग्णाला ठरावीक होमिओपॅथिक औषधे उपयोगी पडतातच असे नाही तर प्रत्येक रुग्ण हा दुसर्‍या रुग्णापेक्षा भिन्न असतोे. त्यासाठी होमिओपॅथीक तज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक असते.

अधिक माहितीसाठी संपर्क :

डॉ प्रधान होमिओपॅथी अकोला

9881447181

ONLINE VIDEO CONSULTATION AVAILABLE

To book your appointment call / whats app on above contact no.









No comments:

Post a Comment

मायग्रेन का सही इलाज : होमिओपॅथी

 *मायग्रेन कारण, लक्षण और होमिओपॅथी* *माइग्रेन क्या है?* माइग्रेन एक प्रकार का तेज सिरदर्द है। यह घबराहट, उल्टी, या प्रकाश और आवज के प्रति स...