Wednesday, 21 October 2020

ओरल सबम्युकस फायब्रोसिस ( OSF ) तोंडाचा जबडा जखडणे व होमिओपॅथी उपचार

 ओरल सबम्युकस फायब्रोसिस ( OSF ) तोंडाचा जबडा जखडणे व होमिओपॅथी उपचार


गुटखा तंबाखू खाण्याची आजकाल युवा वर्गामध्ये फॅशन झाली आहे. ग्रामीण भागात तर तंबाखू खाणाऱ्यांचे प्रमाण खूप मोठे आहे. अगदी दहा-बारा वर्षाची मुले सुद्धा दिवसाला 2 - 3 गुटख्याच्या पुड्या खातात. कॉलेज कॅम्पसमध्ये तर गुटखा न खाणे हे जणू मागासलेपणाचे लक्षण समजले जाते आणि या सुपारी, गुटखा, पानमसाला, खर्ररा, तंबाखू इत्यादी व्यसनांनी युवकांना दिलेली भेट म्हणजेच ओरल सबम्युकस फायब्रोसिस ( OSF ) किंवा तोंडाचा जबडा जखडणे.

या आजारामध्ये तोंडाच्या आतील भागात पांढरे डाग पडतात. हळूहळू तोंडाच्या मासपेशी आवरून लवचिकता नष्ट होते.

तोंडाचा आकार लहान होतो. तोंड उघडायला त्रास होतो. तोंडाची आग होते.

भारतीय उपखंड अर्थात भारत, पाकिस्तान व बांगलादेश या देशात हा आजार मोठ्या प्रमाणात आढळतो. 


आजाराची प्रमुख कारणे :  तंबाखू, पान, सुपारी, गुटखा, पानमसाला यांचे अतिसेवन. आहारामध्ये व पोषक घटकांची कमतरता 

निकस कोरडा आहार 

जीवनसत्वे प्रथिने स्निग्धपदार्थ हिरव्या पालेभाज्या यांचा अभाव

दात व एकूण मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष


आजाराची लक्षणे :

तंबाखू, पान, सुपारी, गुटखा, पानमसाला खाण्याचे प्रमाण जेवढे जास्त तेवढेच लक्षणे व त्रास अधिक तीव्र असतो.


तोंड उघडताना त्रास होतो किंवा तोंड अजिबात उघडता येत नाही.

तोंडामध्ये आग होते, काहीही खाल्ले तरी जास्त तिखट लागते.

नेहमी तोंडात फोड येतात. अल्सर, तोंड येणे हे आजार नेहमी होत राहतात.

 गालाच्या मासपेशी कडक झाल्यामुळे गाल / फुगा फुगवणे शिट्टी वाजवणे यासारख्या क्रिया करता येत नाही. 

तोंडामध्ये, जभड्यावर, गालाच्या आतील भागात, जिभेखाली पांढरे डाग दिसतात ते कडक होतात.

काही पेशंटमध्ये तर फक्त चमचा तोंडात जाईल एवढेच तोंड उघडते त्यामुळे त्यांना केवळ पातळ आहारावर जगावे लागते. वेळीच योग्य उपचार न केल्यास आजार वाढून तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.


उपाय :  

तंबाखू , गुटखा, खर्रा, सुपारी खाणे कमी करणे, हळूहळू बंद करणे. 


होमिओपॅथीमध्ये असलेली काही औषधे तंबाखू गुटखा खाण्याची इच्छा कमी करतात. पर्यायाने गुटखा सोडण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे तंबाखूचे दुष्परिणाम जसे तंबाखूमुळे रक्तवाहिन्या बारीक होणे, हृदयाचा त्रास, नपुसकता, पुरुष वंध्यत्व यासारखे इतर आजारही पूर्णपणे बरे करतात. 


संतुलित आहार, प्रथिने व जीवनसत्त्वयुक्त आहार, हिरव्या पालेभाज्या व फळे यांचा वापर वाढवावा.

काहीही खाल्ल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी खळखळून चूळ भरणे.

सकारात्मक दृष्टिकोन.


अलोपॅथी उपचार :

सामान्यपणे दंतरोग तज्ञ  या आजारासाठी तोंडाच्या आतुन गालामध्ये Hydrocortisone हे इंजेक्शन दर आठवड्याला एक ते दीड महिना देतात.

तोंडाचे गालाचे स्नायू सामान्य करण्यासाठी काही वेळा लेजरद्वारे उपचार केले जातात.

परंतु हे उपचार काही काळ आराम देतात व पुन्हा आधीसारखाच त्रास सुरु होतो.


होमिओपॅथी उपचार :

आजाराचे स्वरूप, कालावधी रुग्णाची लक्षणे इत्यादी नुसार योग्य होमिओपॅथिक उपचार केल्यास तोंडाची जखडलेले स्नायू सैल होऊन काही दिवसातच रोगी ओरल सबम्युकस फायब्रोसिस या गंभीर आजारांपासून पूर्णपणे मुक्त होतो. तंबाखू गुटखा खाणे सोडताना, बंद करताना जो काही त्रास होतो व जी लक्षणे दिसतात जसे आळस येणे, कामात लक्ष न लागणे, जांभया येणे, हातपाय थरथर कापणे, आजारी असल्यासारखे वाटणे, पोट साफ न होणे ही सर्व लक्षणे जी व्यक्तीनुसार कमी-अधिक प्रमाणात वेगवेगळी असतात ती होमिओपॅथिक औषधाद्वारे दूर केल्या जाऊ शकतात त्यामुळे तंबाखू खाण्याची इच्छा कमी होते व काही दिवसातच सवय कायमची सुटून त्रास कमी होतो. विशेष म्हणजे या प्रकारच्या उपचारानंतर पुन्हा तोंड उघडताना त्रास होत नाही. कायमस्वरूपी फायदा होतो. 


डॉ. प्रधान होमिओपॅथी

दुर्गा चौक, अकोला.

9881447181

Dr. Pradhan homeopathy, Akola.

Oral submucosal fibrosis OSF OSMF Homoeopathy homoeopath akola dr. Pradhan homeopathy akola dr uday naik dr sanjay raut dr mahadeo wankhade dr kapil bhati homoeopathic clinic best homoeopath akola amravati washim khamgaon buldhana daryapur murtijapur

Oral submucosal fibrosis OSF OSMF Homoeopathy homoeopath akola dr. Pradhan homeopathy akola dr uday naik dr sanjay raut dr mahadeo wankhade dr kapil bhati homoeopathic clinic best homoeopath akola amravati washim khamgaon buldhana daryapur murtijapur

Oral submucosal fibrosis OSF OSMF Homoeopathy homoeopath akola dr. Pradhan homeopathy akola dr uday naik dr sanjay raut dr mahadeo wankhade dr kapil bhati homoeopathic clinic best homoeopath akola amravati washim khamgaon buldhana daryapur murtijapur

Follow us on Google, facebook, instagram.

Rate, Review, comment, Like, Share...

No comments:

Post a Comment

मायग्रेन का सही इलाज : होमिओपॅथी

 *मायग्रेन कारण, लक्षण और होमिओपॅथी* *माइग्रेन क्या है?* माइग्रेन एक प्रकार का तेज सिरदर्द है। यह घबराहट, उल्टी, या प्रकाश और आवज के प्रति स...