व्हर्टिगो / चक्कर / घेरी येणे*
*व होमिओपॅथी उपचार*
चक्कर येणे हा आजार नसून बऱ्याच आजारामधील ते फक्त एक लक्षण आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी चक्कर आलेली असली तरी एका चक्कर येण्यामागे किती कारणे, किती आजार असू शकतात ते आपण पाहू या कारण चक्कर येणे पूर्णपणे बंद होण्यासाठी चक्कर येण्याला कारणीभूत असलेला आजार ठीक होणे आवश्यक आहे.
लक्षणे -
चक्कर येते तेव्हा पेशंटला असं वाटतं की त्याच्या सभोवतालचा परिसर त्याच्याभोवती फिरत आहे किंवा तो स्वतः भोवती फिरत आहे.
गंभीर पेशंटमध्ये सोबतच मळमळ-उलटी,
खूप घाम येणे,
पोटात अस्वस्थ वाटणे,
तोल जाऊन खाली पडतो असे वाटणे किंवा बरेचदा पडणे, मूर्च्छा येणे
इत्यादी लक्षणे दिसून येतात.
*कारणे*
*1) कानासंबंधीत काही समस्या -*
कानामध्ये काही बिघाड असल्यास चक्कर येतात.
आपल्या कानाचे तीन भाग असतात.
१ बाहेरचा भाग
( एक्स्टर्नल इअर )
२ मध्यभाग ( मिडल इअर ) आणि
३ आतील भाग ( इंटर्नल इअर ) .
यापैकी बाहेरील कानामध्ये काही आजार, जखम असल्यास, मळ, फंगस सारखी वाढत असल्यास त्यामुळे चक्कर येतात.
कानाच्या मधल्या भागात जर काही आजार असेल जसे- कानाच्या मधल्या भागावर सूज आल्यास म्हणजेच एक्युट AOM किंवा क्रोनिक ओटायटीस मीडिया COM, क्रोनिक सपुरेटिव्ह ओटायटीस मीडिया CSOM, या आजारांमध्ये कान व नाक यांना जोडणार्या नळीवर सूज आल्यास म्हणजेच युस्थेशियन ट्युब कॅटर या प्रकारात चक्कर येतात.
कानाच्या आतील भागात काही समस्या
हा कानाचा अतिशय नाजूक भाग असतो. या भागात वाढलेले किंवा अनियंत्रित बीपी, शुगर, अपघातांमध्ये, ऑपरेशन करताना काही इजा झाल्यास फटाके किंवा खूप जोराचा आवाजामुळे इजा झाल्यास ( एकोस्टीक ट्रामा )
जंतुसंसर्गामुळे ( लॅब्रिनथायटीस )
चक्कर येतात.
अति थंडीमुळे शरीराचा समतोल ठेवणाऱ्या कानातील भागात बिघाड झाल्याने चक्कर येतात.
*2) कानाव्यतिरिक्त इतर आजार*
१. ॲनिमिया रक्ताल्पता - रक्तामध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असणे बहुतांश स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असते
२. उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब
३.हृदयासंबंधी आजार - यामध्ये कानाला हिणार रक्तपुरवठा बाधित झाल्याने चक्कर येतात.
४.मधुमेह शुगर कमी होणे किंवा शुगर वाढणे
५.मानेचा मणक्याचा आजार - मानेच्या मणक्यांची झीज झाल्याने, नसा दबल्याने चक्कर येतात.
६. उपवास - मेंदूला कानाला
७. दारू तंबाखू यांचे अतिसेवन
८. उन्हात खूप वेळ काम करणे ९. अतिसार, उलट्या व पातळ संडास यासारख्या कारणांमुळे शरीरातील रक्त व पाणी यांचे प्रमाण कमी झाल्यास चक्कर येते
१०. अति थंड वातावरण
*उपचार -*
चक्करसाठी व्हर्टिन, सिंझान ह्या गोळ्या सामान्यपणे आपण घेतो. या गोळ्यांनी चक्कर तात्पुरते थांबतात परंतु पूर्णपणे जात नाहीत. चक्कर च्या पूर्ण निराकरणासाठी चक्कर येण्यास कारणीभूत शारीरिक मानसिक समस्यांचे पुर्ण निर्मूलन होणे आवश्यक असते.
*होमिओपॅथी उपचार -*
रुग्णाची लक्षणे, जीवनशैली, जीवनातील चढउतार, ताण तणाव, चिंता, भीती, इ. , आजाराचे स्वरूप व कारणे यानुसार चक्कर येण्यास कारणीभूत असलेल्या मुख्य आजारावर होमिओपॅथिक उपचार करून घेतल्यास चक्कर चा त्रास पुर्णपणे बरा होतो.


No comments:
Post a Comment